लोणवाडी बुद्रूक येथील वृद्धाची रेल्वे खाली आत्महत्या
जळगाव

लोणवाडी बुद्रूक येथील वृद्धाची रेल्वे खाली आत्महत्या

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी

लोणवाडी बुद्रूक येथील लहू कौतिक पाटील (वय ७०) या वृद्धाने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बोरनार-म्हसावद रेल्वे मार्गावर धावत्या मालगाडी खाली आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

लहू पाटील यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रागाच्या भरात घर सोडले होते. शेजारच्या तांड्यावरील टेलरकडे शिवायला कपडे टाकले आहे, ते घेवून येतो, असेही त्यांनी घराच्या बाहेर जाताना कुटुंबीयांना सांगितले होते. म्हसावद-बोरनार रेल्वे मार्गावर सायंकाळी एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. पोलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी घेवून गेले होते. मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी पोलीसपाटील व्हॉटसऍप ग्रुपवर घटनास्थळावरील व मृतदेहाचे फोटो, वर्णन व इतर माहिती व्हायरल केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.

याबाबत म्हसावद येथील रेल्वे कर्मचारी पॉइसमन सोनू मनोहर चापरवार यांनी खबर दिली. त्यावरुन पोलिसात नोंद झाली. तपास नाईक शशिकांत पाटील करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com