जुने बी.जे. मार्केटमधून थकबाकीपोटी ५५ लाखांची वसुली

उपायुक्त संतोष वाहुळे, प्रशांत पाटील तीन तास ठाण मांडून
जुने बी.जे. मार्केटमधून थकबाकीपोटी ५५ लाखांची वसुली

जळगाव jalgaon

व्यापारी संकुलातील Merchant Packages गाळेधारकांना थकबाकी Arrears भरण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे jalgaon municipal administration करण्यात येत आहे. थकबाकी न भरल्यास सीलची कारवाई करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. दरम्यान, जुने बीजे मार्केटमधील Old BJ Market काही गाळेधारकांनी मंगळवारी थकबाकी भरली असून ५५ लाखांची वसुली झाली आहे.

गाळेधारकांनी शास्ती आणि पाचपट दंड वगळता उर्वरीत रकमेतील किमान ५० टक्के थकबाकी भरण्याबाबत प्रशासनाने आवाहन केले आहे. या आवाहनाला गाळेधारकांनीदेखील सकारात्मकता दर्शविली होती.

त्यानुसार मंगळवारी दुपारी १२.३० वाजता उपायुक्त संतोष वाहुळे, उपायुक्त प्रशांत पाटील Deputy Commissioner Santosh Wahule, Deputy Commissioner Prashant Patilयांच्यासह पथक बी.जे. मार्केटमध्ये पोहचले. यावेळी अधिकार्‍यांनी गाळेधारकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले.

त्यानुसार काही गाळेधारकांनी त्याच ठिकाणी धनादेश दिले तर काही गाळेधारकांनी महानगरपालिकेत येवून धनादेश दिले असून, ५५ लाखांची थकबाकी वसुली झाली आहे. दुपारी १२.३० वाजेपासून ते ३.३० वाजेपर्यंत पथक मार्केटमध्ये ठाण मांडून होते. आतापर्यंत जुन्या बी.जे.मार्केटमधून सुमारे दोन कोटींची वसुली झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com