तरुणाने बनविला तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ
जळगाव

तरुणाने बनविला तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ

जळगाव शहरातील धक्कादायक घटना

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शेजारच्या खोलीत राहणार्‍या बांधकाम कामगाराने घरमालक तरुणीचा चोरून आक्षेपार्ह व्हिडीओ बनविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदरील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराचे बांधकाम सुरू असल्याने साहित्य ठेवण्यासाठी दिलेल्या शेजारच्या खोलीतून बांधकाम कामगाराने चोरून लपून घरमालक तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी व्हिडीओ तयार करणार्‍या संशयित तरुण आसिफ बेग यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणी तिची आई तसेच भावासह वास्तव्यास आहे. त्याच्या घराशेजारी असलेल्या बांधकाम सुरु आहे. सिमेंट वगैरे साहित्य ठेवण्यासाठी तरुणीच्या आईने बांधकाम कामगारांना खोली दिली. 17 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास 22 वर्षीय तरुणी घरात एकटीच होती. त्यावेळी घरात बांधकाम कामगार तरुण आला. त्याने तरुणीला मेमरी कार्ड दिले. तसेच त्यात तरुणीचे काही व्हिडीओ असल्याचे त्याने सांगितले.

या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार आईला न कळविता, हा प्रकार फोनवरुन तिचे शेजारच्यांना कळविला. त्यानुसारचे शेजारचे आले. त्यांनी तरुणीला संबंधित मेमरी कार्डमधील व्हिडीओ तिच्या लॅपटॉपमध्ये तपासण्यास सांगितले असता, यात अंघोळीनंतर कपडे बदलवित असतांनाच तरुणीचा एक मिनिटाचा अश्लिल व्हिडीओ तयार केला असल्याचे दिसून आले. यानंतर तरुणीने या प्रकाराबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तरुणीच्या घरी पोहचले. मेमरी कार्ड देणार्‍या आतिफ याकूब बेग (वय 20, रा. आझादनगर, पिंप्राळा हुडको) याची चौकशी केली असता त्यानेच तरुणीचा अश्लिल व्हिडीओ बनविला असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांचे माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल, मुकेश पाटील, हेमंत कडकर , चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, शांताराम पाटील या कर्मचार्‍यांनी संशयित आसिफ बेग यास अटक केली. पुढील तपास पो.हे.कॉ. संजय भोई करीत आहे

Deshdoot
www.deshdoot.com