आमदारांच्या विरोधात व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट
जळगाव

आमदारांच्या विरोधात व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट

तिघांविरोधात गुन्हा ; मुख्यमंत्र्यांना ‘ रिकामचोट ’ शंब्दप्रयोगनतंर व्हॉट्‌सॲप ग्रुपवर पोस्ट व्हॉयरल

Manohar Kandekar

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgoan

चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या बदनामीच्या उद्देशाने व राजकिय सुडबुध्दीने व्हॉट्सअपवर गृपवर पोस्ट टाकणे व प्रसारित करणे तिघांना चांगलेच महागात पडले आहे. तिघांविरोधात भाजपाच्या तालुकाध्यानी गुन्हा दाखल केला.

रहा अपडेट गृप.नं.१ या व्हॉट्सअप गृपचे ॲडमीन दिलीप गणसिंग घोरपडे यांनी जाणीवपूर्वक, व्देषभावानेने व सुडबुद्धीने भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात दि,२ रोजी, दुपारी ३.१५ वा. आमदारांच्या चेहारावर प्राण्यंाचा व स्त्रींच्या फोटो लावून व वादग्रस्त मचकुर रहा अपडेट गृप नं.१ या व्हॉट्सअप गृपवर प्रसारीत केला.

खोटी माहिती व शहराची शांतता भंग होईल या उद्देशाने हि माहिती प्रसारीत करण्यात आली. तसेच या गृपचे ऍडमीन मुराद पटेल व वर्धमान धाडीवाल हे ग्रृपचे ऍडमिन असल्याने गृ्रपमध्ये प्रसारीत होणार्‍या फोटोज, व्हिडीओ व इतर मचकुरवर देखरेख, नियंत्रण ठेवण्याचे व आक्षेपार्ह मजकुर प्रसारित न होऊ देण्याची सर्वस्वी जबाबदारी दोघांची होती.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम यांच्या फिर्यादीवरुन दिलीप गणसिंग घोरपडे, मुराद पटेल, वर्धमान धाडीवाल यांच्या विरोधात भादवी कलम २९०,२९२-ए, ५०१, ५०४, ५०५, ५०७, ३४ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय मयुर भामरे करीत आहेत.

दरम्यान भाजपाचतर्फे करण्यात आलेल्या आदोलनात आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना ‘ रिकामचोट ’ असा शंब्दप्रयोग केल्यानतंर त्यांच्याविरोधात ‘ रहा अपडेट गृप.नं.१ ’ या व्हॉट्सॲप गृपवर अनेक प्रकराच्या पोस्ट व्हॉयरल करण्यात आल्या होत्या. शिवसेनेतर्फे परवाच आमदारांविरोधात आदोलन करुन अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा चाळीसगावात शिवसेनेच्या प्रवक्त्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे हे प्रकरण भविष्यात चांगलेच तापणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com