जळगाव मनपा : भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांना नोटीस

सात दिवसात म्हणणे सादर करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
जळगाव मनपा : भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांना नोटीस

जळगाव- प्रतिनिधी Jalgaon

महानगरपालिकेतील (Municipal Corporation) भाजपचे २७ बंडखोर नगरसेवकांसह मनपा आयुक्त ( Municipal Commissioner), जिल्हाधिकारी (Collector) यांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी नोटीस बजाविली आहे. अपात्र का करु नये अशा आशयाची नोटीस २७ बंडखोर नगरसेवकांना बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात आपले म्हणणे सादर न केल्यास कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा देखील नोटीसद्वारे देण्यात आला आहे. या नोटीस सोबतच सुमारे एक ते दीड हजार कागदपत्रांची छायांकितप्रत देखील देण्यात आली आहे.

यांना बजाविली नोटीस

भाजपचे ५७ नगरसेवकांपैकी पहिल्या टप्प्यात २७ नगरसेवकांनी तर दुसर्‍या टप्प्यात ३ नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. त्यानुसार २७ बंडखोर नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी नोटीस बजाविली आहे. त्यासोबतच जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचाही समावेश आहे. यामध्ये नगरसेविका प्रिया जोहरे, सरीता नेरकर, ऍड. दिलीप पोकळे, रुक्सानाबी खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, मीना सपकाळे, दत्तात्रय कोळी, रंजना सपकाळे, प्रवीण कोल्हे, चेतन सनकत, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, प्रतिभा देशमुख, कुलभूषण पाटील, पार्वताबाई भिल, सिंधूताई कोल्हे, ललित कोल्हे, ज्योती चव्हाण, रेखाताई पाटील, सुरेखा सोनवणे, रेश्मा काळे, मनोज आहूजा, मिनाक्षी पाटील, सुनिल खडके, मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com