बेडशीटमध्ये मृतदेह देणार्‍या साधना हॉस्पिटलला नोेटीस

जिल्हा शल्यचिकित्सकांची कारवाई; मान्यता रद्द करण्याचा दिला इशारा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून तो अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याचे संतापजनक वृत्त दै. देशदूतने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकर्‍यांनी संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकीत्सकांनी साधना हॉस्पिटवर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल का कर नये या आशयाची नोटीस बजाविली आहे.

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील 49 वर्षीय शेतकर्‍याचा शहरातील साधना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतांना मृत्यू झाला होता.

रुग्णालय प्रशासनाकडून बाधित रुग्णाचा मृतदेह शासकीय नियमानुसार प्लास्टीकच्या बॅगमध्ये पॅक न करता तो चादरीत गुंडाळून नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याचा धक्कादायक वृत्त दै. देशदूतने प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित साधना हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी तात्काळ या हॉस्पिटलला तुम्ही कोरोनाची महामारी पसरविण्यास जबाबदार धरण्यात येवू नये? तसेच आपल्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येवू नये या आशयाची नोटीस बजाविली आहे.

तसेच याबाबत दोन दिवसात खुलासा सादर करावा अन्यथा त्यांना देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

नियम धाब्यावर

महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपाच्या दवाखाना, वैद्यकीय व अग्निशामन विभागाच्या अधिकार्‍यांना सोबत घेत तक्रार प्राप्त झालेल्या हॉस्पिटलची अचानक पाहणी केली.

यावेळी त्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार उपचार होत आहे की नाही याची पाहणी केली. अनेक ठिकाणी नियतांची अंमलबजाावी होत नसल्याचे दिसून असल्याने रुग्णालयाला याबाबत जाब विचारला असता, त्यांनी आपली चूक मान्य केली.

अवाजवी बिल आकरणार्‍या 6 रुग्णांलयांची महापौरांकडून पाहणी

अवाजवी बिल वसूलीच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महापौर व उपहापौरांनी शहरातील सहा हॉस्पिटलची पाहणी केली.

तसेच याठिकाणाहून प्राप्त झालेल्यातक्रारींबाबत डॉक्टरांना विचारण केली असता, त्यांनी अवाजवी बजाविण्यात आलेल्या बिलाची रक्कम परत देणार असल्याची कबुली दिली असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com