चाळीसगाव न.पा.च्या मुख्याधिकारीपदी नितीन कापडणीस

अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले
चाळीसगाव न.पा.च्या मुख्याधिकारीपदी नितीन कापडणीस

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

चाळीसगाव नगरपरिषदेला अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले आहेत. मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त असलेले नितिन कापडणीस यांची नियुक्ती चाळीसगाव न.पा.च्या मुख्याधिकारी पदी करण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यापूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांच्या बदलीनतंर हे पद रिक्त असून प्रभारी मुख्याधिकारी म्हणून भडगावचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याकडे कार्यभार होता. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरात विकास कामांबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. आता मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांच्या नियुक्तीमुळे शहरातील विकास कामांना चालना मिळाणार आहे. दरम्यान त्यांनी आज पदभार स्विकारल्याची माहिती मिळाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com