चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका

पसंतीचा क्रमांक हवा असल्यास याठिकाणी करा अर्ज
चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका
USER

जळगाव - Jaqlgaon

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (Sub-Regional Transport Offices) परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-19/डीव्ही-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 23 सप्टेंबर, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.

ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी 15 सप्टेंबर, 2021 पासून अर्ज सादर करावेत. अर्ज दुपारी चार वाजेपर्यंत स्वीकारले जातील. या अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनादेश (Deputy Regional Transport Officer) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा.

विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. ही मालिका चालू असतांना वाहन-4 प्रणाली कार्यान्वीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत दिनांक 22 सप्टेंबर, 2021 रोजी संध्याकाळी 4.00 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनादेश बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. 23 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रक्कमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरीत धनादेश परत करण्यात येतील. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (Shyam Lohi, Deputy Regional Transport Officer), जळगाव यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com