भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal-

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून भुसावळ येथे दि. १२ रोजी संवाद व मार्गदर्शन करणार आहेत.

त्या सभेच्या तयारीसाठी १० फेब्रुवारी रोजी रोजी दुपारी ४ वाजता नियोजन बैठकीचे आयोजन माजी आ. संतोष चौधरी यांच्या तापी किनार्यावरील बंगल्यात करण्यात आले आहेे.

या बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील, माजी आ. संतोष चौधरी मार्गदर्शन करणार आहेत तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सर्व सेल्सचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्यकारिणी पदाधिकारी, राष्ट्रवादी वर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष दिपक मराठे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी, शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी केले आहे.