चाेपडा : नवरदेव, वर्‍हाडीनंतर वधुसह कुटुंबीय पॉझिटीव्ह
जळगाव

चाेपडा : नवरदेव, वर्‍हाडीनंतर वधुसह कुटुंबीय पॉझिटीव्ह

48 पैकी 37 अहवाल निगेटीव्ह तर 11 जण पॉझिटिव्ह

Rajendra Patil

चोपडा । प्रतिनिधी-

झुरखेडा (ता.धरणगाव) येथील नवरदेव, नातेवाईक व वर्‍हाडी पॉझिटीव्ह आल्याच्या घटनेनंतर अडावद येथील वधू सह कुटुंबीय व मेकअप करणारी महिला असे पाच संशयित पॉझिटीव्ह आढळून आल्याने एकच खडबळ उडाली आहे.

दरम्यान शहरातील महाविद्यालया च्या कोविड सेंटरला क्वॉरंटाइन असलेल्या 48 संशयितांचे अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले. त्यात 37 जणांचे अहवाल नेगिटीव्ह आले तर 11 संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.त्यात शहरातील तीन, खाचणे येथील एक तर अडावद येथील नववधू व तिचे कुटुंबीय तसेच मेकअप करणारी महिला अशा पाच जणांचा समावेश आहे.त्यामुळे चोपड्यात कोरोना रुग्णांची संख्या 251 वर पोहचली आहे.

शहरातील महाविद्यालयाच्या कोविड सेंटरला क्वॉरंटाइन असलेल्या 48 संशयितांचे अहवाल मंगळवारी दुपारी प्रशासनास प्राप्त झाले.

त्यात 37 जणांचे अहवाल नेगिटीव्ह आले असून,11 संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.त्यात शहापूर (मुंबई) एसटी बस डेपोचे चालक व कंडक्टर अशा तीन कर्मचार्‍यांमध्ये अंबाडे (ता.चोपडा) येथील 32 वर्षीय पुरुष, धामणगाव (ता.जळगाव) येथील 35 वर्षीय पुरुष तर शहरातील गुरुकुल नगर मधील 40 पुरुष, खाचणे येथील 57 वर्षीय पुरुष तसेच अडावद (ता.चोपडा) येथील नववधू सह आई, वडील,आत्या तसेच वधूचा मेकअप करणारी महिला यांचेसह गावातील 12 वर्षीय मुलगा,9 वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांनी देशदूतशी बोलतांना दिली

नवरदेवासह नववधू पॉझिटीव्ह : झुरखेडा (ता.धरणगाव) येथील तरुणाचा दि.14 जून रोजी अडावद (ता.चोपडा) येथे मोजके नातेवाईक व वर्‍हाडिंच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला होता. विवाहानंतर झुरखेडा येथील नवरदेव पॉझिटीव्ह आढळून आल्याने जवळच्या आठ नातेवाईकांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते या घटनेने झुरखेडा व अडावद येथील दोन्ही परिवारांमध्ये प्रचंड खडबळ उडाली होती. या घटनेनंतर चार दिवसांनी म्हणजे दि.30 जून मंगळवारी अडावद येथील नववधू सह आई, वडील, आत्या तसेच वधूचा मेकअप करणारी महिला असे पाच जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

आधी कोरोनामुक्त झालेल्या अडावद गावात आजपर्यंत 21 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून,त्यात खासगी डॉक्टर्स सह दोघांचा एप्रिल महिन्यात मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com