जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

वर्षानुवर्षे विविध कारणाने प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्यासाठी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 12 डिसेंबर, 2020 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली विधी व सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचा शुभारंभ होणार आहे.

या लोक अदालतीस जिल्हाधिकारी अभिजीत राउत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सतिश कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा वकील संघ यांची उपस्थिती आणि सहकार्य लाभणार आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व खटला दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने काढण्यासाठी 12 डिसेंबरच्या राष्ट्रीय लोकअदालतीत आपला सहभाग नोंदवून लोकअदालतीचा लाभ घ्यावा.

असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सचिव कौ. हे. ठोंबर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com