नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यात काल तीन मोटरसायकल चोरी घटना घडली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मनोज चुनिलाल तांबोळी यांची 20 हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.39-एम.0474) अज्ञात चोरटयांनी नवजीवन बियरबारसमोरून लंपास केली.

याप्रकरणी मनोज तांबोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पवार करीत आहेत. तर दुसर्या घटनेत शहादा येथील शिवसुंदरमध्ये राहणार्या सी.कुमेश यांच्या राहत्या घराच्या अंगणातून 1 लाख 42 हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.ए.पी.03-सी.यु. 4222) व 52 हजार रूपये किंमतीचा मोटरसायकल (क्र.एम.एच.39-ए.जी.8466) या दोन मोटरसायकल लंपास केल्या.

याप्रकरणी सी.कुमेश यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ मेहरसिंग वळवी करीत आहेत.