नगरदेवळा : श्री बालाजी महाराज रथोत्सव रद्द

ग्रामस्थांच्या आनंदावर विरजण
नगरदेवळा : श्री बालाजी महाराज रथोत्सव रद्द

नगरदेवळा, ता.पाचोरा - Pachora

नगरदेवळा गावचे अराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराज रथोत्सव बंद मुळे नगरदेवळा व परीसरातील भाविकांच्या आनंदावर विरजण पडल्याने निराशा झाली आहे.

अधिक माहिती अशी की,सद्या कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभाव लक्षात घेता रथोत्सवाची परवानगी मिळाली नसून जागेवरच पूजा करण्यासंबंधी आज पाचोरा पोलीस निरीक्षक कीसनराव नजन पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली नगरदेवळा आऊट पोस्ट पोलीस स्टेशन ला झालेल्या बैठकीत ठरले.यावेळी बैठकीस बालाजी मंदिर ट्रस्टी, मुन्ना परदेशी,मोहन तावडे, मिलिंद दुसाने,मोहन तावडे,माजी सरपंच सुधाकर महाजन, अरुण काटकर,माजी ग्रामपंचायत सदस्य अब्दुल गनी कमरूद्दीन, नूरबेग, शांतता कमिटी सदस्य नाना महाजन, राजेंद्र पवार, अशोक सोन्नी, विलास भामरे,अशोक महाजन, राजेंद्र चौधरी, अशोक चौधरी,मिलिंद दुसाने, पत्रकार प्रकाश जगताप, मिलिंद दुसाने, शैलेंद्र बिरारी, दिपक (सोनू) परदेशी फारूख शेख, पोलीस हवालदार कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पोलीस शिपाई विनोद पाटील, नरेंद्र विसपुते,नरेंद्र शिंदे,मनोहर पाटील,अमोल पाटील उपस्थित होते.दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सव खंडीत होऊ नये अशी ग्रामस्थ,व ट्रस्टींची मागणी होती,परंतु परत सुरू झालेल्या कोरोना प्रार्दुभाव लक्षात घेता सर्व सणावर बंदी घालण्यात आली आहे त्याचप्रमाणे रथोत्सव व यात्रा सुध्दा बंद ठेवण्यात आलेली आहे .तरी गावातील व बाहेरगावाहून येेेणाऱ्या व्यवसाईकांना यात्रेत दुकाने लावता येणार नाही.असे बालाजी मंदिर ट्रस्टी,स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

बालाजी मंदिर व रथ प्रागंणात जागेवरच दिनांक २८-११-२०२० शनिवार रोजी पालखी,२९-११-२०२० रविवार रोजी रथाची ३०-११-२०२० सोमवार रोजी अंगद वहनांची पूजा करण्यात येणार असून दर्शनास येणाऱ्या परीसरातील भाविकांनी तोंडाला रुमाल कींवा माक्स बांधावा, गर्दी न करता सोशल डीस्टंशन ठेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा,तसेच ट्रस्टी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस, ग्रामपंचायत, प्रशासन, बालाजी मंदिर ट्रस्टी तर्फे करण्यात आले आहे.

तोंडाल रुमाल कींवा माक्स बांधावा सोशल डीस्टंशन पाळावेत असे आवाहन नागरीकांना गृप ग्रामपंचायत पोलीस प्रशासन तर्फे वारंवार करण्यात आले आहे,परंतु बहुतांश नागरीक तोंडाला रुमाल कींवा माक्स न बांधता स्वैराचाराने कुणाचाही विचार न करता फीरतात त्यांचेवर गृप ग्रामपंचायत प्रशासन कारवाई कां करीत नाही?असाही प्रश्न ज्येष्ठ सुज्ञ नागरीकांमधून चर्चेद्वारा ऐकावयास मिळत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com