बांभोरी पूलावर अपघातात माय - लेक ठार

टँकरने चिरडले : दुचाकीस्वार बहिण जखमी
बांभोरी पूलावर अपघातात माय - लेक ठार

जळगाव - jalgaon

एरंडोल (Erandol) येथून बहिणीसोबत (sister) दुचाकीने (sister) जळगावातील मुक्ताईनगरात(In Muktainagar) माहेरी येत असतांना ट्रॅकरने (Tracker) दिलेल्या धडकेत चाकाखाली आल्याने (accident) दुचाकीवरील (Two-wheeler) मायलेक ठार (accident) झाल्याची घटना सोमवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली. चारुशिला उर्फ प्राची राहूल पाटील (Prachi Rahul Patil) (वय ४०,रा.ता.एरंडोल) व त्यांचा मुलगा निशांत (Nishant) (वय १२) अशी मयतांची नावे असून अपघातात मयत चारुशीला यांची दुचाकीस्वार शिक्षिका असलेली बहिण रुपाली पाटील (Rupali Patil) (वय ४५,रा.एसएमआयटी महाविद्यालयाजवळ, जळगाव) या जखमी (Injured) झाल्या आहेत.

एरंडोल येथे चारुशिला पाटील या पती राहूल पाटील व मुलगा निशांत यांच्यासह वास्तव्यात होत्या. त्यांची मोठी बहिण रुपाली पाटील या एरंडोल येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. त्या जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालयाच्या परिसरात वडिल लिलाधर पाटील व आई यांच्यासह वास्तव्यास आहेत. जळगाव ते एरंडोल त्या रोज दुचाकीने अपडाऊन करतात. सोमवारी चारुशिला व मुलगा निशांत हे दोघं रुपाली सोबत एम.एच.१९ डी.क्यू.३८९६ या क्रमांच्या दुचाकीने जळगावात माहेरी आई, वडिलांच्या भेटीसाठी येत होते. यादरम्यान बांभोरी पूलावर खड्डयामुळे तोल जावून दुचाकीसह तिघं जण रस्त्यावर पडले. त्यात मागून येणार्‍या गॅस टँकरच्या चाकाखाली आल्याने चारुशिला व निशांत जागीच ठार झाले तर रुपाली पाटील यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जखमी झाल्या. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ती सुरळीत केली.

Related Stories

No stories found.