तुझ्या भावाचा मर्डरच करतो, दोघांची तरुणीला धमकी

रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल
तुझ्या भावाचा मर्डरच करतो, दोघांची तरुणीला धमकी

जळगाव- jalgaon

मागील भांडणाच्या Quarrel कारणावरून एका तरूणीला Young lady अश्लिल शिवीगाळ करून तुझ्या भावाचा मर्डरच Murder करतो अशी धमकी Threat देणार्‍या दोन जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात Ramanand Nagar Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात राहणार २८ वर्षीय तरूणी आपल्या भाऊ आणि कुटुंबियांसह राहते. ३ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून सागर शिंपी आणि हर्षील शिंपी (पुर्ण नाव माहित नाही) दोघे रा. नवनाथ मंदीराजवळ हरीविठ्ठल हे तरूणीच्या घरासमोर येवून तुझा भाऊ कुठे आहे.

त्याने आम्हाला मारले आहे. त्याला जिवंत सोडणार नाही. असे सांगितले. त्यावर भाऊ घरात नसल्याचे तरूणीने सांगितले. यावरून दोघांनी तरूणीला अश्लिल शिवीगाळ केली आणि आज तुझ्या भावाचा मर्डरच करतो अशी धमकी दिली.

तरूणीने घाबरलेल्यावस्थेत रामानंद नगर पोलीस ठाण्यात येवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात सागर शिंपी आणि हर्षल शिंपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी उषा सोनवणे करीत आहे.तुझ्या भावाचा मर्डरच करतो, दोघांची तरुणीला धमकी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com