पारोळ्यात एकाचा खून ; नऊ जणांना अटक
जळगाव

पारोळ्यात एकाचा खून ; नऊ जणांना अटक

पारोळ्यात खळबळ, घटनेने शहर हादरले

Rajendra Patil

पारोळा - श. प्र. Parola

येथील शेवडी गल्लीतील भूषण रघुनाथ चौधरी (वय 24) यास त्याच गल्लीत राहणारे रावा भटू चौधरी, शांताराम भटू चौधरी, राजेश शांताराम चौधरी, विठोबा दयाराम चौधरी, ज्ञानेश्वर भटू चौधरी, जगदीश शांताराम चौधरी, कमलबाई शांताराम चौधरी, स्वीटी शांताराम चौधरी, मिनाबाई ज्ञानेश्वर चौधरी, अशांनी संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमवुन आमच्या घरासमोर येऊन रावा चौधरी याने त्याच्या हातातील फरशीच्या तुकड्याने भाऊ भूषण याच्या डोक्यात मारून दुखापत करून खून केला.

तसेच क्रमांक एक ते नऊ अशांनी भाऊ भूषण यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली त्यावेळी मी माझी पत्नी व माझे आई-वडील असे त्यांना आवरण्यात गेलो असता मला क्रमांक पाच ज्ञानेश्वर भटू चौधरी याने त्याचे हातातील विटाईने माझे गुडघ्यावर मारून दुखापत केली तसेच माझे आई व पत्नी यांना क्रमांक सात ते नऊ यांनी मारहाण केली.

त्यावेळी भाऊ भूषण यास क्रमांक सहा जगदीश शांताराम चौधरी हा मोठ्या आवाजात बोलून तू कोणाशी फोनवर बोलत होता ते सांग नाहीतर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही असे बोलून त्यास मारहाण करून भाऊ भूषण रघुनाथ चौधरी वय 24 वर्षे यास आरोपी क्रमांक एक ते चार यांनी भूषणला धरून आमच्या घरातील पहिल्या माळ्यावरील खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यास मारहाण करून झोक्याचे दोरीने गळफास लावून जीवे ठार मारून टाकले व घरावर विटा व दगडांचा मारा करुन दरवाजावर खिडक्यांचे तसेच माझ्या मालकीची हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम.एच.19 बीपी 30 37 इस दगडांनी मारून नुकसान करून निघून गेले अशी फिर्याद मयत भूषण यांचा भाऊ पंकज रघुनाथ चौधरी यांनी पारोळा पोलिस ठाण्यात दिली.

या फिर्यादीवरून वरील नऊ आरोपीच्या विरुद्ध भादवि कलम 302, 324, 323, 452, 427, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (3) 1 (क) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळी चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे,अमळनेर विभागीय पोलीस अधिकारी श्री अग्रवाल, पारोळा सपोनि रवींद्र बागुल, सुदर्शन दातीर, पोउनि गणेश मुर्हे, यांनी भेट दिली या घटनेचा पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड हे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com