जळगाव हादरले : सलग दुसर्‍या दिवशी खून

जळगाव हादरले : सलग दुसर्‍या दिवशी खून

जळगाव - Jalgaon

शहरातील आंबेडकरनगर येथे राजु पंडीत सोनवणे (वय ५५) यांचा राहत्या घरात खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे.

कालच निमखेडी परिसरात दोन्ही मुलं आणि वडीलांमध्ये वाद झाला. बघता बघता वडीलांनी हातात चाकू घेतला, कौटुंबीक वादाचे रूपांतर हाणामारीत पोहचले व वडीलांकडील चाकू हिसकावत पोटच्या मुलांनीच बापाचा खून केला. या घटनेचा विसर पडत नाही तोच दुसऱ्या दिवशीच पुन्हा जळगाव शहरात खूनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षकांसह कर्मचार्यांचा ताफा घटनास्थळी हजर झाला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com