महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांची मुंबईला बदली

अन्न नागरी पुरवठा विभागात उपसंचालकपदी नियुक्ती
महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांची मुंबईला बदली

जळगाव - Jalgaon

शहर महानगरपालिकेचे (Municipal Corporation) मुख्य लेखा परीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांची मुंबई येथे बदली झाली आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात उपसंचालक, वित्तीय सल्लागार व उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश बुधवारी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव माधवी गांधी यांनी काढले आहेत.

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील राज्यातील ६ अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात जळगाव महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांचाही समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com