मुंबई हावडा मेल विशेष गाडीही शॉर्ट टर्मिनेट

पश्‍चिम बंगाल मधील लॉकडाऊनचा परिणाम
मुंबई हावडा मेल विशेष गाडीही शॉर्ट टर्मिनेट
संग्रहित छायाचित्र

भुसावळ - Bhusawal :

पश्‍चिम बंगाल मध्येलॉकडाऊन जाहीर केल्यामुळे मुंबई - हावडा मेल हि गाडी हावडा ऐवजी राउलकेला स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.

गाडी क्र.०२८०९ डाऊन मुंबई - हावडा मेल विशेष गाडी दि.१४ व २१ ऑगस्ट रोजी राउलकेला पर्यंतच धावेल. (हावडा स्टेशनपर्यंत जाणार नाही). गाडी क्र. ०२८१० अप हावडा - मुंबई मेल विशेष गाडी दि. ५ रोजी हावडा ऐवजी राउलकेला स्थानकावरुन रवाना होईल. प्रवाशांनी हा बदल लक्षात घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com