झोपेत असलेल्या शालकाचा मेव्हण्याने केला खून

मुक्ताईनगर येथील घटना; संशयित फरार
झोपेत असलेल्या शालकाचा मेव्हण्याने केला खून
आरोपी

मुक्ताईनगर - Muktainagar - वार्ताहर :

शहरातील पशु चिकित्सालया जवळील इमारतीत कौटुंबिक वादातून मेव्हण्याने झोपेत असलेल्या 24 वर्षीय शालकाच्या डोक्यात कुर्‍हाडीचा वार घालून खून केल्याची घटना दि. 16 रोजी सकाळी 6.30 वाजता उघडकीस आली.

खून सासरी पाहूणचारी आलेल्या जावयाने केल्याचा संशय असून या घटनेनंतर जावई फरार झाला आहे. तर पोलीस पथक संशयिताच्या तपास करीत आहे.

कौंटुबिक वाद पोलीसात व न्यायालयात तक्रार केल्याच्या कारणावरुन चुंचाळे (ता.यावल) येथील जावयाने मुक्ताईनगरात सासरी येत 24 वर्षीय शालकाचा गुरुवारी मध्यरात्री झोपेत कुर्‍हाडीने वार करुन जिवे ठार केले. याप्रकरणी एकाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भुसावळ रस्त्यावर वामन चावदस ठोसरे यांचे घर असुन 14 पासुन त्यांची मुलगी अश्वीनी ही औषधोपचारासाठी मुक्ताईनगर येथे आलेली होती. मुलीचे पाठोपाठ विजय चेतराम सावकारे रा.चुंचाळे ता.यावल हा पण आला होता.

गुरुवारी जेवण करुन विशाल वामन ठोसरे व विजय सावकारे हे वर असलेल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सावकारे याने शालक असलेल्या विशाल ठोसरे हा झोपेत असतांना त्याचे डोक्यावर कुर्हाडीने वार करीत जिवे ठार मारले. याप्रकरणी वामन ठोसरे यांचे फिर्यादीवरून संशयीत आरोपी विजय सावकारे याने त्याचेविरूद्ध पोलीस व न्यायालयात तक्रार केल्याचा रागापोटी माझा मुलगा विशाल ठोसरे याला जीवे मारले यातील मयत तरुण हा अतिशय मनमिळावू व सुस्वभावी असा होता.

दरम्यान यातील संशयित विजय सावकारे याचेविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करीत आहे. घटनेचे वृृृत्त कळताच पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करीत तपासणी केली.

घटनास्थळी पोलीस अधिकारी व पथक दाखल

दरम्यान, सकाळी ही घटना समजता बरोबर मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड तसेच पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि पोलीस पथक यांनी मुक्ताईनगर येथील भुसावळ रोड लगत असलेल्या पशू चिकित्सलया जवळील घटनास्थळ गाठले त्याच प्रमाणे श्वान पथकाला आहे.याठिकाणी पाचारण करण्यात आले होते.

त्यासोबतच याठिकाणी फॉरेन्सिक पथकानेही हजेरी लावली. दरम्यान संशयिताने फरार होण्यासाठी वापरलेली मोटारसायकल हरताळेजवळ आढळून आली आहे.

मृत तरुण मुख्याध्यापकांचा मुलगा

दरम्यान मयत करून विशाल ठोसरे हा सालबर्डी येथील जि.प.च्या मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वामन ठोसरे यांचा लहान मुलगा आहे मुख्याध्यापक ठोसरे यांना दोन मुले व एक मुलगी अशी अपत्ये आहेत. त्यापैकी लहान मुलगा विशाल याचे चार महिन्यापूर्वी लग्न झाले परंतु काळाने गुरूवारच्या रात्री त्याच्यावर घाव घातला आणि विशालला मृत्यूने गाठले दरम्यान घरात मृत्युमुखी पडलेल्या मुलाला पाहून आई वडील व नातेवाईक यांना मोठा धक्का बसला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com