महावितरणच्या सीनियर टेक्निशियन महिला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

महावितरणच्या सीनियर टेक्निशियन महिला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव - Jalgaon

तक्रारदार यांचे घरगुती मिटर कमर्शियल न करता व दंड न करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रूपयांची लाच स्वीकारतांना महावितरण कंपनीच्या जोशीपेठेतील कार्यालयात कार्यरत सीनियर टेक्निशियन शोभना दिलीप कहाने, वय-५६ यांना आज जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयात सापळा रचून पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकुर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोहेकॉ.दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ.शैला धनगर, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com