महावितरणच्या कर्मचार्‍याला मारहाण

विद्युत मिटर बदली करण्याचा आला राग,चाळीसगाव पोलिसात गुन्हां दाखल
 महावितरणच्या कर्मचार्‍याला मारहाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या टाकळी प्र.चा.येथील यशवंत विद्यालयाच्या पाठीमागे एका ग्राहकाचे फॉल्टी मिटरच्या बदल्यात नवीन इलेक्ट्रीक मिटर बसविण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍याला ग्राहकाने दमदाटी करुन, कानशिलात मारल्याची घटना दि,४ रोजी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला ग्राहकाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महावितरणचे टाकळी प्र.चा भागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद रामभाऊ शेंडे व त्यांचे सहकारी नितीन जाधव असे दि,४ रोजी टाकळी प्र.चा येथील यशवंत विद्यालयाच्या पाठीमागे राहणारे ग्राहक रामकृष्ण अवचित पाटील यांच्या घराचे फॉल्टी मिटर काढुन नवीन विद्युत मिटर बसविण्यासाठी गेले असता, रामकृष्ण पाटील यांनी नवीन विद्युत मिटर बसविण्यास विरोध केला.

तसेच दोघे कर्मचार्‍यांशी हुज्जत घालुन प्रमोद शेंडे यांच्या कानामागे मारली, तसेच नितीन जाधव यांना देखील लोटलाट करुन, शिवीगाळ करुन दमबाजी केली. ऐवढ्यावर ते थांबले नाहीत, तर प्रमोद शेंडे यांच्या जवळील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून तो जमिनीवर आपटून त्याचे नूकसान केले.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com