खासदार,आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
जळगाव

खासदार,आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

शेतकर्‍यांच्या भावनाशी खेळणारे सरकार

Manohar Kandekar

चाळीसगाव - प्रतिनिधी chalsigaon

दुध पावडरची निर्यात बंद केल्यामुळे दुधाला भाव मिळण्यासाठी एकतर शासनाने दुध पावरची निर्यातीवरील बंदी उठावी नाहीतर, दुधाला १० रुपये वाढीव भाव द्यावा अशी मागणी करत, महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरी व दुधउत्पादकांच्या भावानाशी खेळणारे सरकार असल्याचा घणाघात चाळीसगाव येथील आदोलनात खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. तसेच लहानाचे-मोठे मुंबईत झालेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शेतकर्‍यांचे कष्ट कधी कळणार असा सवाल उपस्थित करुन मुख्यमंत्र्यांवर सडकून टिका केली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संकाळी १० वाजता आंदोलनला सुरुवात झाली. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या आंदोलनात नगराध्यक्षा, सभापती, नगरसेवक, महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आदोलनामुळे काही काळ सिंग्नल चौकातील वाहतुक ठप्प झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दुधाचे दर कमी झाले आहेत.

त्यामुळे शेतकर्‍यांना तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे शेतकरी पूर्णपणे बेजार झाला असून गुराढोरांना लागणारा चारा मिळत नाही, ढेपचे भाव गगनाला भिडले आहेत. तर एकीकडे दुधाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये व दुध पावडरला सरसकट ५० रुपये मिळावेत आशा मागण्या आदोलनातून करण्यात मान्यवरांनी केल्यात

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com