चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज चाळीसगाव येथील महात्मा फुले जनआरोग्य संकुल ट्रामा केअर सेंटर मध्ये कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील पं. स. माजी सदस्य दिनेश बोरसे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी पी बाविस्कर, भुषण पाटील, जाधव मॅडम, कुंदन मॅडम, अमोल मराठे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या लस निर्मितीसाठी मोलाचे योगदान देणार्या देशाच्या सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक आभार ! सर्वांनी लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.