खा.रक्षा खडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क

ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांनीही केले मतदान, माजी मंत्री एकनाथराव खडसेंची पहिल्यांदाच तालुक्यात गैरहजेरी
खासदार रक्षाताई खडसे
खासदार रक्षाताई खडसे

मुक्ताईनगर - Muktainagar

तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान आहे, खासदार रक्षाताई खडसे तसेच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष ॲड.रोहीणी खडसे खेवलकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाचा हक्क कोथळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर ती जाऊन बजावला.

ॲड.रोहीणी खडसे खेवलकर
ॲड.रोहीणी खडसे खेवलकर

नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे असेही नागरिकांना खासदार रक्षा खडसे यांनी आवाहन केले आहे. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे त्यापैकी चार ग्रामपंचायती ती बिनविरोध झाल्या असून गेल्या 47 ग्रामपंचायतीमध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये पहिल्यांदा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे मुंबईला असल्यामुळे ते मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे मतदानासाठी उपस्थित राहू शकलेले नाहीत.

मुक्ताईनगर तालुक्‍यातील नांदवेल येथील एका मतदान केंद्रात किरकोळ वाद झाला तर धामणदे येथील एका केंद्रात मतदान यंत्राचा बीप असा आवाज येत नसल्याने सदरचे यंत्र बदलून त्या ठिकाणी दुसरे यंत्र लावण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com