जळगाव

गाई, म्हशीसह दुधाचे कॅन घेऊन आंदोलन

रस्त्यावर ओतले दूध, भारतीय जनता पार्टीचा एल्गार

Rajendra Patil

धरणगाव - प्रतिनिधी Dharngaon

दुध उत्पादकांना सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळायलाच पाहिजे अशी मागणी करत भाजप महायूतीच्या वतीने धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दुधाचे शासकीय भाव वाढीसाठी गाई, म्हशी घेऊन रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले.

गेंड्याची कातडी असलेल्या आणि झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य शासनाला दुध उत्पादक, मका उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी बांधवाच्या समस्या सोडवण्यास भाग पाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ शासनाचा निषेध करत आंदोलन केले.

तरी या आंदोलनात जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, शिरीष बयस, तालुकाध्यक्ष ॲड.संजय महाजन, गुलाब बाबा पाटील, पुनीलाल महाजन, ॲड.भोलाने बापु, शेखर पाटील, जिजाबराव पाटील (गारखेड़ा), नगरसेवक गटनेते कैलास माळी, शरद धनगर, ललित येवले, गुलाब मराठे, भालचंद्र माळी, मधुकर रोकेड़े, प्रसिध्दी प्रमुख टोनी महाजन, जगन महाजन (हिंगोणे), राजू देसले (भोद), दिनेश पाटिल (भोणे), निर्दोष पाटील (सोनवद), कडू धनगर (पाळधी), दिलीप महाजन, सुनील चौधरी, विजय पाटील, डोंगर चौधरी, आबा पाटील, विनोद मोतीराया (अहिरे), पिंटू पाटील, मधुकर पाटील, नाना पाटील, कन्हैया रायपूरकर, योगेश ठाकरे, टोनी महाजन, गणेश धनगर, प्रेमराज महाजन, लखीचंद पाटील, रोहिदास कोळी (खरदे), अरुण नारखेडे (साळवे), भगवान पाटील (रोटवद), निंबा भदाणे (बिलखेडा), दीपक पाटील (बोरगाव), अनिल पाटील, दीपक पाटील (भोणे), सदाशिव पाटील (चिंचपुरा), राकेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील (वाघळूद), सुनील पाटील सर, प्रल्हाद पाटील, सुदाम मराठे, राजू महाजन, ईच्छेश काबरा, विजय महाजन, अमोल महाजन, शरद भोई, विकास चव्हाण, शुभम चौधरी, नाना धनगर, नानू महाजन आदी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजपच्या वतीने रास्तारोको करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com