शेतकरी आंदोलनालनाच्या पाठिंब्यासाठी आंदोलन

जगन सोनवणे यांची माहिती : राज्यपालांच्या निवासस्थान अर्धनग्न मोर्चा
पत्रकार परिषदेत माहिती देताना जगन सोनवणे सोबत संघटनांचे पदाधिकारी (छाया- कालु शहा)
पत्रकार परिषदेत माहिती देताना जगन सोनवणे सोबत संघटनांचे पदाधिकारी (छाया- कालु शहा)

भुसावळ (प्रतिनिधी) - Bhusawal

दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला भारतीय संविधान बचाव सेनेच्यावतीने माजी कृषि मंत्री खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पाठिंबा देण्यात आला आहे. या निमित्ताने पाच दिवसीय विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी दिली.


येथील शासकीय विश्रमगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीआरपी युव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, संतोष मेश्राम, शकिल शहा, शागीर शहा रोशन शहा, विक्की मेश्राम, विशाल पवार, किरण तायडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

माजी कृषि मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात पाच दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे. यात दि. ७ रोजी व्यापार्‍यांना विनंती करण्यासाठी सायं. ६ वाजता गांधी पुतळा, रेल्वे ब्रीज -पांडुरंग टॉकीज, जैन दवाखाना, मरिमात मंदीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भिमालय कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रॅली काढून व्यापार्‍यांना विनंती करण्यात येणार आहे. ८ रोजी सकाळी १० वाजता किसान रॅली. दि.१० रोजी विविध दहा स्थानकांवर विविध दहा संघटनांच्या वतीने रेल रोको. ११ रोजी दुपारी २ वाजता मुंबई येथे राज्यपालांच्या निवासस्थानी अर्धनग्न मोर्चा, १२ रोजी दुपारी २ वाजता आझाद मैदान, ते सीएसटी किसान रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना निवेदनाच्या प्रती देऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचे जगन सोनवणे यांनी सांगितले.

या आंदोलनाला पीआरपी सह, भारतीय ओडबसम क्रांती, महान देशभक्त भारतीय शहिद टिपू सुलतान सेना, थ्री छत्रपती सेना, भारतीय संविधान बचाव सेना या संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com