ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून आंदोलन

ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून आंदोलन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट एकरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी आदि मागण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि राज्याचे माजी मंत्री महादेवराव जानकर व रा.स.प. उत्तर महाराष्ट्र प्रभारी माणिकराव दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

याबाबतचे निवेदन चाळीसगावचे तहसिलदार अमोर मोरे यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंगाडे, रा.स.प. चाळीसगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख देवेंद्र पाटील, रा.स.प. युवक आघाडीचे शहर प्रमुख अण्णा गवळी, रा.स.प. चाळीसगाव शहर प्रमुख सागर जाधव, रा.स.प. तालुका संघटक बापु लेणेकर, डॉ. सुभाष निकुंभ, प्रा. हेमंत पाटील, संजय गढरी (मेहुणबारे), तुळशिराम सुळ, पंढरीनाथ रावते, आदित्य साबळे, डिगांबर आगोणे आदि कार्यकर्ते मोठयासंख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com