कृषी विधेयकाविरुद्ध संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

२१ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बैठकीत ठरणार आंदोलनाची दिशा
बाजार समितीत झालेल्या बैठकीत उपस्थित माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, किसानसभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व इतर प्रमुख पदाधिकारी
बाजार समितीत झालेल्या बैठकीत उपस्थित माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, किसानसभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व इतर प्रमुख पदाधिकारी

रावेर|प्रतिनिधी - Raver

देशभर गाजलेल्या पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाने कृषी विधेयक वादात सापडले आहे.या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी रावेर येथील संघर्ष समिती आंदोलनाची दिशा व व्याप्ती ठरण्यासाठी पूर्व तयारी म्हणून बैठक आज बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली.

यात येत्या २१ फेब्रुवारीला तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन,कृषी विधेयक बाबत भूमिका निश्चित केली जाणार आहे.याच अनुषंगाने रविवारी येथील बाजार समितीत झालेल्या बैठकीत कृषी विधेयकाविरोधात उपस्थित पदाधिकारी यांनी सूर काढला. यावेळी संघर्ष समितीचे सुरेश पाटील, कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,शिवसेनेचे योगीराज पाटील, राष्ट्रवादीचे निळकंठ चौधरी, राका युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, जिजाबराव चौधरी,राजीव सुवर्णे,उमेश गाढे,बबलू सावंत आदी उपस्थित होते.उपस्थितांनी मोदीसरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com