मातृदिन विशेष : शिळे अन्नावर उदरनिर्वाह करीत लेकींना बनविले कर्तृत्ववान

जळगावातील भाजी विक्रेत्या साधना सानप यांची प्रेरणादायी कहाणी
 मातृदिन विशेष : शिळे अन्नावर उदरनिर्वाह करीत लेकींना बनविले कर्तृत्ववान
घरात अठरा विश्व दारिद्रय... तीन मुलींची जबाबदारी... Responsibility of girls अशातच पतीचे आकस्मिक निधन झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला.अशा परिस्थितीतून कुटुंबासह स्वत:ला सावरत भाजीपाला विक्री Vegetable sales करीत व लग्न समारंभातील शीळे अन्न पोळ्या वाळत घालून त्यावर उदनिर्वाह केला. वारंवार येणार्‍या संकटांना सामोरे जात त्यावर मात करीत लेकींना उच्चशिक्षण देत त्यांना कर्तृत्ववान बनविले. अशी रामेश्वर कॉलनीतील Rameshwar Colony सावित्रीची लेक साधना सानप Sadhana Sanap यांना मातृदिनी सलाम.

जळगाव jalgaon । अमोल कासार

घरात अठरा विश्व दारिद्रय... तीन मुलींची जबाबदारी... अशातच पतीचे आकस्मिक निधन झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला.अशा परिस्थितीतून कुटुंबासह स्वत:ला सावरत भाजीपाला विक्री करीत व लग्न समारंभातील शीळे अन्न पोळ्या वाळत घालून त्यावर उदनिर्वाह केला. वारंवार येणार्‍या संकटांना सामोरे जात त्यावर मात करीत लेकींना उच्चशिक्षण देत त्यांना कर्तृत्ववान बनविले. अशी रामेश्वर कॉलनीतील सावित्रीची लेक साधना सानप यांना मातृदिनी सलाम.

जळगावच्या रामेश्वर कॉलनीतील साधना पद्माकर सानप या सासू यांच्यासह आपल्या मुली आरती, भारती व पुजा यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. त्यांची माहेरची परिस्थिती हालाकीची असल्याने आई वडीलांसोबत शेतात जावून भाजीपाला विक्री करीत कुटुंबाला हातभार लावित होत्या.

त्यानंतर विवाह झाला परंतु सासरची परिस्थिती देखील हालाकीची असल्याने त्या सासरी गेल्या पंधरा वर्षांपासून भाजीपाला विक्री करुन त्यांनी पती, तीन मुली व सासू सासर्‍यांचा सांभाळ केला. परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

मात्र अशा परिस्थितीला न डगमगता त्यांनी स्वत:सह सावरत आपल्या मुलींना उच्चशिक्षीत करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. सद्यस्थितीला त्यांच्या दोघी मुलींचा विवाह झाला असून एक मुलगी शहरातील युनियन बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.

तिन्ही लेकींना केले उच्चशिक्षित

आपण अडाणी असल्याने आपल्याला भाजीपाला विक्री करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करावा लागला. परंतु आपली ज्या परिस्थितीत राहिलो तशी परिस्थिती आपल्या मुलींची होवू नये म्हणून साधना सानप यांनी आपल्या तिन्ही लेकींना उच्चशिक्षण देण्याचा निर्धार केला. त्यानुसार तिघ मुलींना उच्चशिक्षण दिले.

त्यांची मोठी मुलगी आरतीचे नर्सिंगचे शिक्षण झाले असून त्या नोकरी करीत आहे. तर दुसरी व तिसर्‍या मुलीने डि.एड शिक्षण घेतले आहे. यातील भारती ही युनियन बँकेत असिस्टंट मॅनेजन म्हणून नोकरी करीत आपल्या आईला हातभार लावित आहे.

संकटांसह परिस्थितीवर मात करीत ओढला संसाराचा गाडा

साधना सानप यांची दिनचर्या पहाटे 4 वाजेपासून सुरु होते. पाच वाजेच्या सुमारास त्या स्वत: हातगाडी घेवून बाजार समितीमध्ये खरेदीसाठी जातात. त्यानंतर तेथूनच माघारी येत असतांनाच त्या संपुर्ण रामेश्वर कॉलनी, मेहरुण व मोहाडी रोड परिसरात हातगाडी फिरवून भाजीपाला विक्री करतात. जीवनात अनेक संकटे आलीत परंतु कुठल्याही संकटाला न डगमगता त्यांनी परिस्थितीवर मात करीत आपल्या दोघ लेकींच विवाह सोहळे पार पाडीत संसाराचा गाडा साधना सानप या ओढत आहे.

लहानपणीच लेकींवर जबाबदारी

दिवसभर भाजीपाला विक्री करण्यासाठी बाहेर जाव लागत असल्याने संपुर्ण जबाबदारी आपल्या मुलींवर सोपवावी लागत होती. परंतु मुलींनी देखील आपल्या आईच्या परिस्थितीची जाण ठेवत संपुर्ण घराची जबाबदारी लहानपणीच स्विकारली होती. त्यामुळे साधना सानप यांना कधीच मुलगा नसल्याची जाणीव झाली नाही. त्यामुळे माझ्या तिघ लेकीच माझ्यासाठी मुलांपेक्षा कमी नसल्याचे सानप या अभिमानाने सांगतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com