अडीच वर्षाच्या मुलीसह आईची आत्महत्या

गंभीर अवस्थेतील पित्यावर उपचार, आत्महत्येचा प्रयत्न
अडीच वर्षाच्या मुलीसह आईची आत्महत्या

जळगाव - Jalgaon

अडीच वर्षाची चिमुरडीसह आई-वडीलांनी रेल्वेखाली आपली जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी घडली.

या अपघातात चिमुकलीसह मातेचा अंत झाला तर चिमुकलीचे वडील गंभीर अवस्थेत असून त्यांचेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भुसावळ तालुक्यातील साकेगाव येतील रहिवाशी हरीश शिरीष चौधरी यांनी आपल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीसह पत्नीने रेल्वेखाली झोकून देत जिवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला असता त्यात मातेसह मुलीचा अंत झाला तर वडील हरीश चौधरी गंभीर झखमी झाले असून त्यांचेवर डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस विभाग करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com