नदीत आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

आई -वडील आणि मुलीने तापी नदीत केली आत्महत्या
नदीत आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

धरणगाव प्रतिनिधी Dharangaon

तालुक्यातील भोद येथील रहिवाशी राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीने शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापी नदीत आत्महत्या केली. या घटनेतील राजेंद्र पाटील, मुलगी ज्ञानल पाटील यांचे मृतदेह कालच आढळून आले होते. पत्नी वंदनाबाई पाटील यांचा शोध सुरू होता.

आज दि.19 पहाटे 10 वाजता सावळदे गावानजीक तापीच्या पात्रात वंदनाबाई यांचा मृतदेह आढळून आला. तिघांचे शवविच्छेदनासाठी शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान पाटील (वय-54), पत्नी सौ.वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय-48), मुलगी म्यॉनल राजेंद्र पाटील (वय-21) हे तिघ जण टाटा इंडीका (एमएच-19/एपी-1094) गाडीने काल दि.17 रोजी सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस या सासरवाडीच्या गावाला गेले होते. येथे पितरांचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले होते. तर मुलगा आणि सुन भोद येथेच होते.

नदीत आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह सापडला
एरंडोल तालुका शेतकी संघाच्या संचालकाची पत्नी, मुलीसह आत्महत्या

दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले मात्र, ते भोदला पोहचलेच नाही. दरम्यान सायंकाळी 6 वाजेनंतर त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. मात्र, या कुटूंबाला कुणीही तापीत उडी घेतांना पाहिले नसल्यामुळे या गाडीकडे कुंणी गांभिर्याने पाहिले नाही. मात्र, आज (दि.18) मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक पुरूषाचा मृतदेह तापीत तरंगतांना परिसरातील नागरिकांना दिसला आणि घटनेचे गांर्भीय वाढले. काल बापलेकीचे मृतदेह दिसले असले तरी राजेंद्र पाटील यांच्या पत्नीचा काहीच पत्ता लागलेला नव्हता.

भरवस येथून हे तिघ जण गाडीतून सोबतच भोद जाण्यासाठी निघाले होते. म्हणूनच सौ.वंदनाबाई यांनी सुध्दा तापीत उडी घेवून आत्महत्या केल्याची भिती व्यक्त केली जात आहे. अखेर आज सकाळी दहा वाजता ही भिती खरी ठरली. या कुटूंबाने आत्महत्या का केली असावी याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com