जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाचा कहर सुरु झाला होता मात्र तो मंदावला असून आज दिवसभरात कोरोनाचे 33 नवे रुग्ण आढळून आले आहे. तसेच बुधवारी 35 जण कोरोनामुक्त झाले असल्याने बाधितांपेक्षा बरे होणार्यांची संख्या आज अधिक असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात बाधितांची संख्येत घट झाल्याने नारिकांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरुवात केल्याने नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र आज दिवसभरात कोरोनाचे 33 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा 55 हजार 654 इतका झाला असून 35 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याने आतापर्यंत 53 हजार 919 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत मयतांची संख्या ही 1 हजार 320 इतकी असून जिल्हाभरात 415 जणांवर उपचार सुरु आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर 9, जळगाव ग्रामीण 1, भुसावळ 1, अमळनेर 1, चोपडा 7, पाचोरा 2, धरणगाव 1, एरंडोल 1, जामनेर 1, पारोळा 2, मुक्ताईनगर 5 याच्यासह इतर जिल्ह्यातील 2 असे एकूण 33 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे.