बाजार समितीतून तीन भाजीपाला विक्रेत्यांचे मोबाईल लांबवले
Crime

बाजार समितीतून तीन भाजीपाला विक्रेत्यांचे मोबाईल लांबवले

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) दोन जणांचे मोबाइल भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या भादली येथील भाजीपाला विक्रेत्यासह तिघांचे मोबाइल चोरट्याने लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी प‍ावणे आठ वाजता घडली. याप्रकरणी (MIDC Police Thane) एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील भादली येथील रवींद्र विश्वनाथ सोनार वय ४९ हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. सोनार हे शनिवारी नेहमीप्रमाणे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला घेण्यासाठी आले होते. यादरम्यान त्यांच्या १० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. शोधाशोध केली असता याठिकाणी आणखी दोन जणांचेही मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले. याप्रकरणी रवींद्र सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक इम्रान सय्यद हे करीत आहेत

Related Stories

No stories found.