<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p>बँकेतून पेन्शनचे पैसे काढल्यानंतर किराणा बाजार करण्यासाठी रिक्षाने घाटरोडवर जाणार्या वृध्द महिलेच्या पर्समधील मोबाईल आणि रोख रक्कम रिक्षामध्ये बसलेल्या दोघा महिलांनी लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.</p> .<p>शहरातील रहिवाशी केशरबाई भिला पाटील (७२ ) वृध्द महिला पतीला मिळणारी पेन्शन काढण्यासाठी जे.डी.सी.सी. बँकेत आल्या होत्या. बँकेतून नऊ हजार रुपये काढून, त्या नक्षत्र कापड दुकापासून घाटरोडवरील सागर किराणा दुकानावर किराणा बाजार घेण्यासाठी रिक्षाने जात असतांनाच विजय कापड दुकानाजवळ दोन महिलांनी रिक्षाला हात देवून चौधरीवाड्यात जायचे असे सांगून रिक्षात बसल्या, या महिला चौधरी वाड्याजवळ उतरल्या त्यानंतर सदर वृध्द महिला ही सागर किराणा दुकानाजवळ रिक्षा चालकाला सुट्टे १० रुपये देवून उतरली. किराणामाल घेतेवेळी मात्र तिच्या पर्समधील पैसे आणि मोबाईल असा एैवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी आज चाळीसगांव पोलीस स्टेशनला सदर वृध्देने तक्रार दिली असून या तक्रारीत नऊ हजार रुपये रोख, आठ हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल व इतर असा एकूण १७ हजार रुपयांचा एैवज चोरुन नेण्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.</p>