दीपनगरात स्थानिकांच्या रोजगारासाठी आमदार, खासदारांतर्फे प्रकल्पात आंदोलनाचा इशारा

दीपनगरात स्थानिकांच्या रोजगारासाठी आमदार, खासदारांतर्फे प्रकल्पात आंदोलनाचा इशारा
भुसावळ येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना खा रक्षा खडसे संजय सावकारे व सभापती वंदना उन्हाळे, परीक्षेत बराटे भालचंद्र पाटील (छाया- कालू शहा)

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal -

तालुक्यातील दीपनगर प्रकल्पात Deepnagar Project मागील अनेक वर्षांमध्ये स्थानिक बेरोजगारांना local unemployed डावलून परप्रांतीयांना foreigners रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शिवाय अनेक ठेकेदारही स्थानिक नाहीत. याबाबत ठेकेदारांसह बेरोजगारांच्या संघटनांकडून प्रकल्प प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा मागणी करुनही पाहिजे त्या प्रमाणात लोकप्रतिनिधींनी People's Representatives लक्ष दिलेले नाही. मात्र दरम्यानच्या काळात स्थानिक बेरोजगारांना दीपनगर प्रकल्पाच्या ६६० मेगावॅट प्रकल्पात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी बहुतांश राजकीय पक्ष Political party समोर आले असून आपण रोजगारांच्या पाठिशी असल्याचा आव आणला जात आहे.

राजकीय पक्षांसह लोक प्रतिनिधींना याच काळात बेरोजगारांची आठवण कशी झाली व ते आक्रमक का झाले असा सवाल उपस्थित होत आहे. याला आगामी काळातील भुसावळ व वरणगाव न.पाच्या निवडणुकांची पार्श्‍वभुमीआहे का? त्यामुळेच नेत्यांना बेरोजगारांचा पुळतका तर आला नाही ना? असा सवालही उपस्थित होत आहे. शिवसेनेने या प्रश्‍नात लक्ष घातल्यामुळे भाजाप आक्रमक तर झाली नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दरम्यान, ४ रोजी सायंकाळी येथिल शासकीय विश्रामगृहात भाजपाच्यावतीने खा. रक्षा खडसे व आ. संजय सावकारे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी दीपनगर प्रकल्पाच्या नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या कामात परप्रांतीय रोजगारांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.

त्या तुलनेत स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने स्थानिकांना जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध व्हावा करुन देण्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे. प्रकल्पातील रोजागरांच्या संख्येबाबत प्रकल्पात मागणी करण्यात आली असतांना ही ती अद्याप देण्यात येत नाही. अधिकारी व ठेकेदार मनमाणी करत आहे. स्थानिकांच्या रोजगारासाठी प्रकल्पात प्रयत्न करण्यात येणार असून याबाबीकडे राज्य शासनाने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली.


खा. रक्षा खडसे यांनी, दीपनगर प्रकल्पातील ६६० मे. वॅ. नवीन प्रकल्पाचे काम भेल कडून करण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी भेलकडून स्थानिकांऐवजी परप्रांतीयांनाच मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात आला आहे. त्यात स्थानिकांची संख्या कमी आहे. प्रकल्पात साधारण दीड हजारांवर रोजगार आहे.त्यापैकी ९०० जण परप्रांतीय आहेत. संबंधित ठेकेदाराने वर्तमानपत्रांतून जाहिराती प्रसिद्ध करुन रोजगारांची भरती करावी.

स्थानिक रोजागारांमधून स्किल्ड वर्कर्स न मिळाल्यास इतरांना संधी देण्यास हरकत नाही मात्र प्राधान्य स्थानिकांना असावे असे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा भाजपाचा उद्देश आहे. भेल कंपनी केंद्र शासनाच्या अंतर्गत काम करते याबाबत भेलच्या संचाकांना कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


आ. संजय सावकरे यांनी, स्थानिकांना प्रकल्पात रोजगार मिळण्यासाठी प्रकल्प प्रशासनाकडे दोन वेळेस बैठका व आंदोलने करण्यात आली आहे. भाजपाचा प्रकल्पाच्या विकास कामाला विरोध नाही. राज्यातील विजेची तुट भरुन काढण्यासाठी प्रकल्प महत्वाचा आहे. मात्र त्यात स्थानिकांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. प्रकाल्पासाठी स्थानिकांच्या जमिनी गेल्या आहेत.

त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कबुल करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही. प्रकल्पात ठेकेदारांची मनमानी सुरु आहे. प्रकल्पात कॅम्पस इंटरव्ह्यु घेऊन स्थानिकांना संधी द्यावी अशी अपेक्षा आहे. तालुक्यात स्किल्ड वर्कर्स आहेत. त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार मिळणे आवश्यक आहे. याबाबत ऊर्जामंत्र्यांनी या प्रकाराची दखल घेऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. यापूर्वी प्रशासनाकडे मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रश्‍न सुटला नाही.

याबाबत आगामी काळात खा. खडसे व आपण स्वत: पदाधिकर्‍यांसह प्रकल्पात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


यावेळी खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, पं.स. सभापती वंदना उन्हाळे, भाजपा शहराध्यक्ष परिक्षित बर्‍हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्यासह माजी नगरसेक राजेंद्र आवटे, सतीष सपकाळे, सदानंद उन्हाळे, गिरीष महाजन, अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


दरम्यान, यापूर्वी १ रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. उत्तम सुरवाडे यांच्या उपस्थितीत प्रकल्प अधिकार्‍यांशी बेरोजागारांच्या प्रश्‍नावर प्रशासनाशी चर्चा करण्यात आली असून स्थानिकांना रोजगार देण्याबाबत प्रशासनाने आश्‍वासनही दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com