आ.संजय गायकवाडांच्या प्रतिमेला अंडा मारो आंदोलन

संविधान आर्मी कडून निषेध : अटक व आमदारकी रद्द करण्याची मागणी
आ.संजय गायकवाडांच्या प्रतिमेला अंडा मारो आंदोलन
भुसावळ येथे डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला अंडा मारा आंदोलन करताना संविधान आर्मीचे पदाधिकारी (छाया: कालु शहा)

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal

बुलढाणाचे आ.संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्याकडून चितोडगाव ता. खामगाव (Khamgaon) येथिल दलित समाजाच्या तरुणावर चाकूने हल्ला करुन परिवारातील बहिण व आईलाही मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ येथिल संविधान आर्मीच्या वतीने आ. गायकवाड यांच्या प्रतिमेला अंडामार आंदोलन करुन निषेध व्यक्त केल्याची घटना 4 रोजी ३.३० वाजेच्या सुमारास जुन्या पालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळ्याजवळ घडली.

संविधान आर्मीच्या वतीने आ. संजय गायकवाड यांच्याकडून दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला अंडामारो आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेध आंदोलनात संविधान आर्मीचे अध्यक्ष जगन सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आरीफ शेख, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा प्रमुख गोपी साळी, युवा जिल्हाध्यक्ष राहुल साळुंखे, उपजिल्हा प्रमुख रतन वानखेडे, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाध्यक्ष हरिष सुरवाडे, जमिल बेग खलिल बेग, प्रचार प्रमुख संघपाल किर्तीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सध्या कोरनाच्या संसर्गामुळे आंदोलन व गर्दी करण्यास शासनाच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. असे असतांनाही स्थानिक प्रशासनाची परवाणगी न घेता असंविधान आर्मीच्या पदाधिकार्‍यांनी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आ.गायकवाड यांचा निषेध आंदोलन अचानक केल्यामुळे येथिल बाजारपेठ पोलिसांची धावपळ उडाली. आंदोलनानंतर आंदोलनकर्ते पसार झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com