आ.सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

सरकार जनतेची करमणूक करत असल्याची टीका
आ.सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

जळगाव -jalgaon

सरकारने नुकसानग्रस्तांना मदत (Help the victims)करण्याची नुसती घोषणा (Announcement) केली. प्रत्यक्षात कुणालाही मदत मिळाली नाही. महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) मंडळी जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विदूषकी चाळे (Clown jokes) करण्यातच मश्गूल झाली आहे. ते दररोज वेगळा विनोद करून महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करत आहेत. या शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष (President of Rayat Kranti Sanghatana) सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी सोमवारी जळगावात पत्रकारांशी बोलतांना ठाकरे सरकारवर टिका (attacks Thackeray government) केली. अतिवृष्टी, चक्रीवादळातील शेतकर्‍यांना पीककर्ज माफी द्या. नुकसान भरपाई देताना ती एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन ३ पट द्यावी, अशी मागणीही खोत यांनी यावेळी केली.

राज्य सरकारच्या पंचायत राज समितीच्या दौर्‍यानिमित्ताने सोमवारी सदाभाऊ खोत हे जळगावात आलेले आहेत. जिल्हा परिषदेत आढावा बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारची वाटचाल, शेतकर्‍यांचे प्रलंबित प्रश्न, आजचे भारत बंद आंदोलन अशा विषयांवर त्यांनी मते मांडली. यावेळी बोलतांना सदाभाऊ खोत यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. राऊत हे दररोज विनोदवीरासारखे बॅटिंग करतात. त्यांना मला सांगायचे आहे की, महाभारतातील संजयला रणभूमीवरील युद्ध दिसत होते. त्यावरून तो निर्णय घेत होता. पण, या संजयला मात्र वसुलीचा दृष्टांत पडत आहे. त्यांना जमिनीवरचा विसर पडल्याचे चित्र आहे.


भारत बंद आंदोलनाची उडविली खिल्ली


केंद्र सरकारने पारित केलेल्या ३ कृषी कायद्यांविरुद्ध आज होणार्‍या भारत बंद आंदोलनाचीही सदाभाऊ खोत यांनी खिल्ली उडवली. आजचे आंदोलन पूर्णपणे फसले आहे. मी ५ ते ६ जिल्ह्यातून प्रवास करून आज जळगावात आलो. पण, मला कुठेही भारत बंद आंदोलनाचा परिणाम दिसला नाही. गेली ७० वर्षे बाजार समितीच्या माध्यमातून एकाधिकारशाहीने शेतकर्‍यांना लुटण्याचे काम केले. एकाधिकारशाहीतून जर शेतकर्‍यांची सुटका होत असेल, एक देश-एक बाजारपेठ हे सूत्र अंमलात आणले जात असेल तर या देशातील शेतकरी त्याचे स्वागत करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.


राजकारणासाठी शेतकर्‍याचा बळी देऊ नका


७० वर्षांच्या काळात आम्ही तुमची व्यवस्था बघितली. या व्यवस्थेमुळे ४ लाखांपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. मग आज जर आमच्या क्षेत्रात खुली अर्थव्यवस्था येत असेल, भांडवल गुंतवणूक होत असेल तर प्रक्रिया उद्योग उभे राहून शेतकर्‍याचा शिकलेला पोरगा उद्योजक होत असेल तर आम्ही या कायद्यांचे स्वागत करू. पहिल्यांदा कायद्याची अंमलबजावणी तर होऊ द्या, मूल जन्माला येण्याआधीच ते पांगळे असेल, आंधळे असेल, असे सांगताय. तुम्ही काय ज्योतिष आहात का?, असा सवालही त्यांनी उपस्थित करत, शेतीच्या बाबतीतला निर्णय शेतकर्‍याला घेऊ द्या, तुमच्या राजकारणासाठी शेतकर्‍याचा बळी देऊ नका, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.