वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आ. मंगेश चव्हाण करोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्यांना कोरोना तपासणी करुन घेण्याचे आवाहन महिन्याभरापूर्वीच आमदारांच्या कार्यालयतील कर्मचारीही पॉझिटिव्ह
मंगेश चव्हाण
मंगेश चव्हाण

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्याचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवत असल्याने, त्यांनी आज स्वत:हून कोरोनाची तपासणी केली असता...

त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे उद्या त्यांचा (दि,२३) वाढदिवस असल्यामुळे त्यांनी खबरारी म्हणून चाचणी केली, आणि ती पॉझिटिव्ह आल्याने, पुढील संभाव्य धोका टळला आहे.

आमदार चव्हाण यांची तब्यत चांगली असून त्यांनी स्वता;ला होम क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला चाचणी करुन घेण्याचे, व उद्या वाढदिवसानिमित्ताने गर्दी न करण्याचे आवाहन केले. दरम्यान गेल्या महिन्याभरापूर्वी देखील आमदरांच्या कार्यालयातील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले होते. ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. परंतू आता स्वता; आमदारांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अनेकांना कोरोनाचा धोका संभावत आहे.

करोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी व सर्वांनी आपापली काळजी घ्यावी ही विनंती.

आमदार मंगेश रमेश चव्हाण

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com