जळगाव - jalgaon

वॉटरग्रेस कंपनीचा ठेका जळगाव महापालिका यासह नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, मुंबई, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, दिल्ली, रांची, रायपूर, लखनऊ तसेच आफ्रिका देशामध्ये युगांडा व इतर ठिकाणी कार्यरत आहे.

वॉटरग्रेस व बीएचआर घोटाळा प्रकरणात माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचा काडीचा संबंध नाही, अशी माहिती रविवारी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महापौर भारती सोनवणे, महानगराध्य दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.