सोनाराची नजर चुकवून साडेसहा लाखाचे दागिने लांबविले

सोनाराची नजर चुकवून साडेसहा लाखाचे दागिने लांबविले

चाळीसगाव (chalisgaon) प्रतिनिधी -

चाळीसगाव शहरातील अफ्फु गल्ली येथील उदय ज्वेलर्स या सोन्या-चाँदीच्या दुकानात दोन अज्ञात इसमानी सोनाराची नजर चुकवून ६ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. या प्रकरणी चाळीसगाव chalisgaon पोलीस स्टेशनला दोन भामट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अफ्फू गल्ली येथे अरुण मुरलीधर बाविस्कर यांचे उदय ज्वेलर्स (Jewelers) या नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे, दिनांक 19 रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे संकाळी दुकान उघडले, ११.३० वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसम बाविस्कर यांच्या दुकानात आले, व त्यांनी "आम्ही जैन समाजाचे आहोत आमच्या महाराजांना सोन्या-चांदीचे दागिने भेट द्यायचे म्हणून दागिने दाखवा" असे सांगून दुकानदाराला बोलण्यात गुंतवले, अरुण बाविस्कर यांनी दोघांना विविध प्रकारचे दागिने दाखवले, त्यानंतर त्यांनी एका पिशवीत दागिने भरून बाजूला ठेवले.

आमचे महाराज आल्यानंतर आम्ही दागिने घेऊन जाऊ असे सांगून, त्यापोटी चार हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले. त्यानंतर दोघांनी आम्हाला पाणी मिळेल का असे सांगून सोनाराची नजर चुकवली व प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले ६ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीच्या दागिन्यांवर हात साफ केला. याप्रकरणी चाळीसगाव (chalisgaon) पोलिस स्टेशनला दोघा भामट्या विरोधात अरुण मुरलीधर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com