पिस्तुलचा धाक दाखवून लुटणारा तिसरा आरोपी जेरबंद

एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात, मालेगावातही लुटली होती रक्कम
पिस्तुलचा धाक दाखवून लुटणारा तिसरा आरोपी जेरबंद

जळगाव - Jalgaon

शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परिसरातूल जात असलेल्या एकाला पिस्तूलचा धाक दाखवुन १५ लाख रुपये लुटणार्‍या दोघांना अटक केली होती. याप्रकरणी अजून त्यांच्या तिसरा साथीदार अविनाश सुरेश माने (वय १९, रा. दगडीचाळ, धुळे) याला अटक करण्यात आली आहे.

या तिघांकडून आतापर्यंत २० लाख ६१ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिक्षीतवाडी परिसरातील रहिवासी महेश भावसार हे १ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास १५ लाख रुपयांची रोकड पिशवीत घेवून मोटारयाकलने पंचमुखी हनुमान मंदिराकडे जात होते. यावळी विनाक्रमांकाचया मोटारसायकलवर येत त्यांना पिस्तुलचा धाक दाखवित त्यांच्याकडील रोकड हिसकावून घेतलयाचे घटना घडली होती. त्यानंतर संशयित आरोपी हे धुळे, सुरत व उल्हासनगर येथे पळुन गेले होते.

या दरम्यान, पोलिसांनी उल्हासनगर येथुन खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळं व रितीक उर्फ दादु राजेंद्र राजपूत या दोघांना अटक केली होती. तेव्हापासून हे संशयित आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहेत.

मालेगावातही केली होती जबरीलुट

दरोड्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या रितीक व खुशाल हे सराईत गुन्हे असून त्यांची एमआयडीसी पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत त्यांनी मालेगाव शहरात अविनाश माने यांच्या मदतीने असाच दिवसाढवळा दरोडा टाकलयाची कबुली दिली. तसेच भावसार यांच्याकडून लांबवलेल्या पैशांपैकी काही रक्कम माने याच्याकडे ठेवल्याचेही सांगीतले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव येथे जाऊन माने यालाही ताब्यात घेतले.

तिघ संशयित सराईत गुन्हेगार

पोलिसांनी अटक करण्यात आलेले तिघ संशयित आरोपींविरुद्ध धुळे, मालेगाव व नाशिक शहरात जबरी लुट, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून तिघ सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्याच आधारावर माने यालाही अटक करुन मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

जबरी लुटतील २० लाख रुपये हस्तगत

तिघ संशयित आरोपींनी अनेक जबरी लुटीचे गुन्हे केले आहेत. तिघांनी केलेल्या गुन्ह्यांतून लुटलेल्या रकमेपैकी सुमारे २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. या सराईत आरोपींकडून अजून रोख रक्कम होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com