जिल्हा शिक्षक पतपेढीतर्फे गुणवंताना पारितोषिक

जिल्हा शिक्षक पतपेढीतर्फे गुणवंताना पारितोषिक

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीतर्फे (Teachers Credit Union) नुकताच पारितोषिक वितरण (Prize distribution) समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात सन् १९-२० व २०-२१ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत पाल्यांचा व गुणवंत शिक्षकांचा सत्कार करुन, त्यांना पारितोषिक देण्यात आले.

राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज येथे दि,२५ रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.स.शि.प्र.मंडळाचे सचिव वृक्षमित्र अरुण निकम हे होते. तर प्रमुख पाहुणे खासदार उन्मेष पाटील, सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन विकास पंडित पाटील, सचिव उदेसिंग मोहन पाटील, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोदजी कोतकर, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, पतपेढीचे संचालक बी. टी.सपकाळे (यावल), एन.वाय.पाटील(पाचोरा), पी. एस.पाटील(जामनेर), शैलेश राणे(रावेर), नंदकुमार पाटील(पारोळा), हेमंत चौधरी(भुसावळ), गजानन गव्हारे(जामनेर), पी.डी.पाटील(अमळनेर), जयवंत चौधरी(यावल), व्ही.टी.पाटील(एरंडोल), आर.डी.चौधरी(अमळनेर), यू.यू.पाटील, एस.जी.इंगळे यांच्यासह तालुक्यातील सर्व संचालक उपस्थिती होते .

यावेळी खासदार मा.उन्मेष पाटील यांनी पतपेढी बद्दलचा गुणगौरव केला. तसेच सर्व पुरस्कार्थी पाल्य व शिक्षक यांचा शुभेच्छा देऊन जीवनामध्ये विज्ञानाचे महत्व विशद केले, त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे हे सांगितले. वृक्षमित्रअरुण निकम सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी स्वतः शिक्षक असताना पतपेढीने आपल्या सर्व गरजा कशा पूर्ण केलेले आहेत तसेच जीवनामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग किती खडतर आहे याचा अनुभव सांगितला. श्री.भिरूड यांनी प्रास्ताविकामध्ये पतपेढीचा लेखाजोखा सभासदांपुढे मांडला तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये पतपेढी मध्ये केलेल्या विकास कामांच्या माहितीचा आढावा सांगितला व शिक्षकाच्या जीवनामध्ये पतपेढीच्या कर्जामधून अनेकांची स्वप्न पूर्ण कशाप्रकारे पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. यावेळी तालुक्यातील पतसंस्थेचे माजी संचालक, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पतपेढीचे सचिव मनोहर सूर्यवंशी, तालुक्याचे संचालक अजय देशमुख, श्री. कवळासे सर, प्रा.तुपे सर, श्री.साळुंके सर,जाकीर शेख जाकीर, विजय कदम,निलेश गाढवे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले, तर आभार पतपेढीचे संचालक अजय देशमुख यांनी मानले.

Related Stories

No stories found.