भुसावल -पुणे दरम्यान मेमू विशेष

प्रवाशांच्या सेवेसाठी आरक्षित गाडी
भुसावल -पुणे दरम्यान मेमू विशेष

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal -

रेल प्रशासनाद्वारे  भुसावल पुणे दरम्यान मेमू  विशेष एक्सप्रेस गाडी मनमाड, दौंड कॉर्ड मार्गे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यात गाड़ी क्र. ०११३५ अप भुसावळ -पुणे विशेष एक्सप्रेस १५ व २९ एप्रिल रोजी पहाटे ६.१५ वाजता भुसावळ रवाना होऊं त्याच दिवशी दुपारी ४.४५ वाजता पुणे पोहोचेल.

तर ०११३६ डाउन पुणे - भुसावळ विशेष एक्सप्रेस १६व ३० एप्रिल रोजी पुणे येथुन सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.४५ वाजता भुसाव. पोहोचेल ही गाडी मनमाड, चाळीसगाव, जळगाव, उरूळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव स्थानकांवर थांबेल.

या गाडीला ८ आरक्षित सिटिंग कोच असतील. या गाडीत केवळ कंफम तिकिट असलेल्या प्रवाशांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com