मेहुणा अन् शालकाचा फंडा, ऑनलाइन गंडविण्याचा अवलंबिला धंदा

मेहुणा अन् शालकाचा फंडा, ऑनलाइन गंडविण्याचा अवलंबिला धंदा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

उज्ज्वला गॅस एजन्सीची Ujjwala Gas Agency डीलरशीप मिळवून देतो, असे सांगून कालीदास विलास सुर्यवंशी Kalidas Vilas Suryavanshi वय 33 रा. दहीगाव ता. यावल यांची 10 लाख 33 हजार रुपयांत फसवणूक Cheating झाल्याप्रकरणी 6 जानेवारी 2021 रोजी सायबर पोलीस ठाण्यात Cyber police station गुन्हा दाखल आहे.

या गुन्हयात सायबर पोलिसांनी शनिवारी सुनील कुमार ब्रम्हदेव उर्फ अनिल कुमार वय 38 रा. गुनाबस्ती, तेजपुर, बिहार, व कन्हैय्या कुमार राजेंद्र सहान वय 43 रा बेलीया घाट मेन रोड, कलकत्ता या दोन संशयितांना पंजाब पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दहीगाव येथील कालिदास सुर्यवंशी यांना उज्ज्वला गॅस एजन्सीची डिलरशीप मिळवून देतो, असे सांगून संशयितांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच बारकोड पाठवून त्याद्ारे वेळावेळी सुर्यवंशी यांच्याकडून 10 लाख 33 हजार रुपये स्विकारले. प्रत्यक्षात कुठलीही डिलरशीप न मिळाल्याने फसवणुकीची खात्री झाल्यावर याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील संशयितांना दिल्ली येथील सीबीआयच्या पथकाने अटक केली होती. तसेच पंजाब राज्यातील नॅरोट, जयमालसिग, पठाणकोट या पोलीस ठाण्यात गुन्हयात दोघांना वर्ग करण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळाल्यावर सायबर पोलिसांचे वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, प्रवीण वाघ, ललीत नारखेडे, नितीन भालेराव या कर्मचार्‍यांचे पथक पंजाब राज्यात रवाना झाले होते. पंजाब पोलिसांकडून संशयित सुनील सहानी व कन्हैय्या साहनी या दोघांना ताब्यात घेत शनिवार, 20 ऑगस्ट रोजी जळगाव गाठले.

संशयित दोघेही

मेव्हुणा आणि शालक

संशयित सुनीलकुमार साहनी व कन्हैय्या हे दोघेही नात्याने मेहुणा आणि शालक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हाताला काम नसल्याने दोघांनीही कलकत्ता येथे एका ठिकाणी दुकान भाड्याने घेवून त्या ठिकाणाहून ऑनलाईन गंडविण्याचा धंदा सुरु केला. कमी मेहनतीत जास्तीचा पैसा मिळत असल्याने दोघं मेहुणा आणि शालकाने अनेकांना गंडविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com