दोन वेळेस नापास झाल्याने एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

दोन वेळेस नापास झाल्याने एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय Dr. Ulhas Patil Medical College व रुग्णालयाच्या प्रथम वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेली वैष्णवी किशोर लोखंडे Vaishnavi Kishor Lokhande (वय 22) ही विद्यार्थिनी सलग दुसर्‍यांदा नापास failing twice झाल्याने शुक्रवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या suicide केल्याची खळबळजनक घटना शहरातील गुरू कॉलनीत घडली. आत्महत्येपुर्वी तीने सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात Ramanand Nagar Police Station अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, वैष्णवी किशोर लोखंडे ही डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकत होती. आज सायंकाळी निकाल जाहीर झाला असून वैष्णवी प्रथम वर्षाच्या फेरपरिक्षेत नापास झाली.

हा आघात सहन न झाल्याने आज शुक्रवारी 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास राहत्या घरात दाराला लॉक लावून दोरीन गळफास घेवून आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी मुलगी दरवाजा उघडत नसल्याने तीच्या आईने जाऊन बघितले असता, दरवाजा आतून बंद होता.

दरम्यान तिच्या आईने दरवाजा जोरात ढकलताच तो उघडला आणि समोर आपल्या मुलीने गळफास घेतल्याचे दिसून आले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर यांनी तीला मयत घोषीत केले.

खूप हार्डवर्क केलं पण यश नाही आलं...

आत्महत्या करण्यापुर्वी वैष्णवीने सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात म्हटले आहे की, स्वारी मम्मी, मी खूप हार्डवर्क केल पण तरी मला यश आले नाही असे लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

आई वडील दोघेही शिक्षक

वैष्णवीचे वडील किशोर लोखंडे हे जळगाव या.दे. पाटील माध्यमिक विद्यालयात तर आई शहरातील महापौर जयश्री महाजन यांच्या जय दुर्गा माध्यमिक विद्यालयात शिक्षिक आहेत. मयत वैष्णवीच्या पश्चात भाऊ, आई वडील असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com