महापौरांनी घेतला स्वच्छतेचा आढावा

मनपा प्रशासनासह मक्तेदारांना अंमलबजावणीचे आदेश
महापौरांनी घेतला स्वच्छतेचा आढावा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

येथील प्रभाग क्र. 12 व 13 या दाट लोकवस्ती असलेल्या समतानगर परिसराला आज दुपारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट दिली.

तेथील गटारींच्या स्वच्छतेसह घंटागाडी, सहा सार्वजनिक शौचालये, अमृत योजनेंतर्गत झालेली कामे यांची गल्लीबोळात जाऊन पाहणी केली. यावेळी मनपाच्या अधिकार्‍यांसह मक्तेदारांना महापौरांनी अमलबजावणीचे आदेश दिले.

माता रमाई आंबेडकर जलकुंभाजवळील श्री छत्रपती चौकापासून पाहणी दौरा सुरू करून हनुमान मंदिर, साई मंदिरासह त्याच्या पाठीमागील विहिरीनजीकचा परिसर, बजरंग चौक, आंबेडकर पुतळा आदी ठिकाणी भेट दिली.

सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या संपूर्ण भागात फिरून महापौर, उपमहापौरांनी या भागातील नागरिकांचे प्रश्न, अडचणी समजावून घेतल्या. नगरसेवक नितीन बरडे, महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील, शहर समन्वयक महेंद्र पवार, आरोग्य सुपरिटेंडेंट उल्हास इंगळे, आरोग्य निरीक्षक चेतन हलागडे, कुणाल बारसे, सुपरव्हायझर ऋषिकेश शिंपी, मुकादम नंदू पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com