‘माता अमृत मदर’ मिल्क बँक

‘माता अमृत मदर’ मिल्क बँक

काय आहे हा उपक्रम

जळगाव - Jalgaon

येथील रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्ट (Rotary Club of Jalgaon West) आणि जळगाव पिपल्स को-ऑपरेटीव्ह बँक (Jalgaon People's Co-operative Bank) रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट (Ramdas Patil Smriti Seva Trust) यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल (Chhatrapati Shahu Maharaj Hospital) मध्ये माता अमृत मदर मिल्क बँकेत जगातिक स्तनपान सप्ताह व दुधदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी माजी प्रांतपाल किशोर केडिया, राजीव शर्मा, शब्बीर शाकीर, अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, मानद सचिव अनुप असावा, माता अमृत मदर मिल्क बँक चेअरमन संगीता पाटील, सहप्रांतपाल डॉ.गोविंद मंत्री, माजी अध्यक्ष रमण जाजू, संदीप काबरा, अरुण नंदर्षी, गनी मेमन, नितीन रेदासनी, डॉ. राजेश पाटील, योगेश भोळे, तुषार चित्ते, राजेश परदेशी, सुनील सुखवाणी, केकल पटेल, इनरव्हील क्‍लब ऑफ न्यू जेन (Inner Wheel Club of New Zen) च्या अध्यक्षा नेहा संघवी, सचिव ईशिता दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभर बाळ व आई यांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी साजरा केला जातो. आईचे दूध हे नवजात शिशुसाठी संपूर्ण पोषन अन्न आहे याच उद्देशाने ही मदर मिल्क बँक सुरु करण्यात आली आहे. स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने दूध दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने अतिरिक्त दूध दान करणार्‍या मातांचा यावेळी गौरव करण्यात आला. यशस्वीतेसाठी शाहू महाराज हॉस्पिटलचे व्यवस्थापक संतोष नवगाळे, परिचारिका वैशाली काळे, छाया जगताप व लोखंडे मॅडम यांनी परिश्रम घेतले. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे माता अमृत मदर मिल्क बँकेचे दुध संकलन केंद्र देखील नुकतेच सुरु करण्यात आले आहे.

आपल्या स्वतःच्या बाळाचे पोट भरल्यानंतर अतिरिक्त असणारे दूध मातांनी दान करावे. यामुळे ज्या बाळांची आई स्वतःचे दूध बाळाला पाजू शकत नाही किंवा दुदैवाने बाळाच्या जन्मानंतर आई मृत्यू पावली असल्यास त्या गरजू बाळांना माता अमृत मदर मिल्क बँकेतून दूध उपलब्ध होते. दूध दान करण्यासाठी किंवा हवे असल्यास छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, गणेश कॉलनी रोड जळगाव येथे मदर मिल्क बँकेत रविवार सोडून सकाळी 10 ते 5 या वेळेत किंवा 2223301 या फोन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com