कुलरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

वांजोळा येथील घटना, बंद रिक्षात सोडले प्राण
कुलरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू
मयत शारदा बाविस्कर

वांजोळा, ता. भुसावळ -वार्ताहर Bhusawal

घरकाम करत असतांना कुलरचा शॉक (coolar shok) लागून २७ वर्षिय विवाहीतेचा मृत्यु झाल्याची घटना १७ रोजी सकाळी १० वाजता घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथिल रहिवासी विवाहिता शारदा वसंत बावस्कर (धनगर) (वय २७) या सकाळी घरात घरकाम करत असतांना त्यांना घरातील कुलरचा लॉक लागल्याने त्या फेकल्या गेल्या मात्रत्यानंतर ही त्यांचा पाय कुलरला लागूनच असल्याने कुलरचा शॉक लागल्याने त्या अत्यवस्थ झाल्या होत्या.

रिक्षातच सोडला जीव -घटनेच्या वेळी घरात कोणीच नसल्याने व घटना उशीरा लक्षात आल्याने त्यांना तात्काळ रिक्षातून भुसावळ आणत असतांना भुसावळ रोडवरील सत्संग भवनाजवळ रिक्षा अचानक बंद पडली. ती सुरु होण्यास विलंब होत असतांना शारदा बाविस्कर यांचा मृत्यु झाला त्यांनंतर त्यांना येथिल डॉ. राजेश मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

यांनी दिली भेट

घटनेची माहिती मिळताच तालुका पो.स्टे.च्या एपीआय रुपाली चव्हाण, हे. कॉ. विजय पोहेकर, नितीन सपकाळे, श्री. रज्जाक यांच्यासह वीज वितरण कंपनीचे साकेगावचे कनिष्ठ अभियंता डी.आर. कोल्हे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी केली. यावेळी पो.पा. संतोष कोळी, सरपंच प्रतिक पाटील, उपसरपंच देविसाद सावळे उपस्थित होते. अंत्यसंस्कार - जळगाव येथिल जिल्हा रुग्णालयात ( civil hospital) त्यांचे शवविच्छेदन करण्यात ओ.त्यांच्यावर दुपारी ४ वाजता वांजोळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com