मन्याड धरण आज शंभरी गाठणार

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
मन्याड धरण आज शंभरी गाठणार

चाळीसगाव- प्रतिनिधी Chalisgaon

तालुक्यातील सिंचनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले मन्याड धरण हे गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी ८० ते ९० टक्के भरले होते. तर काल रात्री धरण परिक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मन्याड धरण ९९ टक्के भरले असून आज दिवसभरात ते शंभरी गाठणार असल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे. या धरणावर २२ खेड्यांचा पाणी पुरवठा व सिंचनसाठीचे पाणी अवलंबुन आहे.

सलग दुसर्‍या वर्षी मन्याड धरण १०० टक्के भरणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण हे ओव्हरफ्लो झाल्याने त्यातील अतिरीक्त पाणी मन्याड धरणा येत आहे. त्यामुळे देखील मन्याड धरणातील जलसाठा वाढल आहे.

हे धरण आज कुठल्याही क्षणी शंभरी गाठणार असल्यामुळे मन्याड धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून मन्याड नदीकाठावरील गावांना सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com